पोळा भारतीय संस्कृती व परंपरेचा वारसा – राजेन्द्र जैन

0
59
1

मामा चौक येथे तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा

गोंदिया : पवित्र श्रावण (मास) महिन्याचा शेवटचा सण म्हणजे बैलपोळा, पोळ्याचा पाडवा म्हणजे तान्हा पोळा हा सण म्हणजे, बालकांच्या उत्साहाचा दिवस व बालकांच्या जल्लोषाची पर्वणीच……….

आज गोंदिया शहर स्थित मामा चौक येथे तान्हा पोळा उत्सव समिती व्दारा आयोजित तान्हा पोळा मध्ये सहभागी होवून माजी आमदार राजेंद्र जैन यांनी बाल गोपालांसोबत जल्लोषात साजरा केला. नंदीची पूजा करुण तान्हा पोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी राजेंद्र जैन म्हणाले कि, पोळा उत्सव भारतीय संस्कृतीचा आहे. तान्हा पोळा बाल गोपालांना आपली परंपरा व सांस्कृतिक मूल्यांशी जोडण्याचे काम करते.

तान्हा पोळ्यात सहभागी बाल गोपालांना मिठाई व बक्षीस वितरण करण्यात आले. यात सर्वश्रेष्ठ नंदी सजावट, वेशभूषा, संगीत खुर्ची विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसराला तोरणांनी सुंदररीत्या सजवण्यात आले. राजेंद्र जैन यांनी उत्कृष्ठ कार्यक्रमाबद्दल आयोजक शहर अध्यक्ष नानू मुदलियार यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजा देशमुख, कमलेश नसीने, संदीप कोटमकर, प्रियेश मुदलियार, स्वप्निल पिल्ले, मनोज लाडेकर, योगेश रामटेककर, मनोज बिसेन, अनिल इलुरु, रवि राहंगडाले यांचे सहकार्य लाभले.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, नानू मुदलीयार, सविता मुदलीयार, सुनिता मेंढे, जयस्वालताई, कविता पिल्ले, सहारेताई, राजू भगत, सत्येंद्र सिंग, भोरेताई श्वेता येडे, पूजा येडे, सुनिता कोटमकर, नीलिमा कोटमकर, पुष्पा देशमुख, अपेक्षा देशमुख, नागपुरेताई, छाया कोटमकर, आरती नशीने, विप्लव भिवगडे, युवराज विश्वकर्मा, आकाश अग्रवाल, प्रकाश आगासे, अमोल बेलगे, रौनक ठाकुर, शिवराज भंडारकर, बिडी जयस्वाल, अनिल सहारे, राधेश्याम मेंढे, अश्विन क्षिरसागर, कैलास क्षीरसागर, प्रदीप कोटमकर, गौरांस कोटमकर, रमण रमादे, तब्बू राव, तुषार जुमळे, दर्शन मानकर, जतीन परयानी, नंदू विश्वकर्मा, सत्यम वर्मा, ब्राह्मणकरजी, राजू सोनी, प्रदीप ठवरे, प्रणव ठाकूर, बाळू कोसळकर, आकाश कटकवार,श्रीमती रोखडे. श्रीमती पैथोड़े, श्रीमती निकोड़े, राजेंद्र कटकवार, पिंटू येडे, गौरव अग्रवाल, अनुप बोरकर गराडेजी, जे के नशिने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरज नागपुरे यांनी केले.