श्री हनुमान पंच कमिटी सत्यम नगर कापसी खुर्द येथे तान्हा पोळ्याचे आयोजन….. येणाऱ्या पिढीला सुसंस्कार व संस्कृतीचा विसर पडू नये म्हणून कार्यक्रमाचे आयोजन…

0
27
1

गोंदिया: भारतीय मानव समाजात सुसंस्कार व सुसंस्कृतीचा विसर पडू नये व येणाऱ्या पिढ्यांना प्रत्येक सणांचा महत्त्व कळावा या उद्देशाने या जगाच्या पाठीवर मानवी जीवन जगत असताना निःस्वार्थपणे व निर्भयपणे समाजकल्याण जनकल्याण व राष्ट्र कल्यानार्थ कार्य करणाऱ्या सर्वच महामानवांच्याच पाऊलांवर पाऊल ठेवत माहाराष्ट्रासह संपूर्ण भारतीय समाजाला हेवा वाटावा असा भव्यदिव्य ताना पोळ्याचा कार्यक्रम नागपूर ग्रामीण व रामटेक लोकसभा मतदारसंघ परिसरातील ग्रामपंचायत कापसी खुर्द सत्यमनगर येथे गेल्या २० / २१ वर्षांपासून चालत आला असून यावर्षी सुध्दा सर्वांच्याच प्रेरणेतून व सहकार्याने दिनांक ०३-०९-२०२४ रोज मंगळवारला श्री हनुमान मंदिर पंच कमिटी सत्यमनगर कापसी खुर्द येथे ताना पोळ्याचे कार्यक्रम भव्यदिव्य स्वरुपात व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,,,,!!

या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सन्माननीय सुरजजी पाटील, सरपंच ग्रामपंचायत कापसी खुर्द, सन्माननीय अक्षयजी रामटेक उपसरपंच ग्रामपंचायत कापसी खुर्द, सन्माननीय नारायनजी ( पिन्टू भाऊ ) दुनेदार ग्रामपंचायत सदस्य कापसी खुर्द, सन्माननीय संदिपजी पारधी, माजी ग्रामपंचायत सदस्य, कापसी खुर्द, सन्माननीय सुनीलजी बिसेन, माजी अध्यक्ष,पोवार समाज एकता मंच पुर्व नागपूर, सन्माननीय शांतीलालजी पुरोहित, डायरेक्टर, विक्रम कुलर कंपनी यांच्यासह सत्यमनगर येथील सर्व सन्माननीय मानवाईक व समस्त ग्रामवासी बंधू भगिनी व बालगोपाल इस्टमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते,,,,,!!

दरवर्षी ताना पोळ्याच्या सुनियोजित कार्यक्रमात श्री हनुमान पंच कमिटी सत्यमनगर कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य व समस्त सत्यमनगर ग्रामस्थांच्या वतीने शिवकालीन शस्त्रकलेचे आयोजन करण्यात येते, ही शिवकालीन शस्त्रकला वर्षानुवर्षे चालत राहावी या संकल्पनेतून यावर्षी सुध्दा शिवकालीन शस्त्रकलेचे यशस्वी अभ्यासक सन्माननीय सुशीलकुमार राहागंडाले, विनोदजी बोरकर, मयुरजी पागोटे, अमोलजी शेन्डे, बादलजी सोनी, सुनीलजी चुटे, योगेशजी सोनी, केतन धनराजजी शेन्डे यांच्या नेतृत्वाखाली शिवकालीन शस्त्रकलेचे आयोजन करण्यात आले असून कापसी खुर्द परिसरातील अनेकानेक नवोदितांना शिवकालीन शस्त्रकलेचा अभ्यास करण्याची संधी देण्यात आली व लाहान लाहान बालगोपालांना शिक्षण साहित्य व इतर साहित्यासह खाऊं वितरणाची परंपरा अविरत कायम ठेवण्यात आली, स्वतः च्या आत्मरक्षासाठी शिवकालीन शस्त्रकला शिकणे ही काळाची गरज आहे यासाठी मुलींसाठी सुद्धा शिवकालीन शस्त्रकलेचे प्रशिक्षणाचे आयोजन करु असा संकल्प ग्रामपंचायत कापसी खुर्द येथील प्रयत्नवादी स्वकर्तूत्वनिष्ठ ब्रम्हनिष्ठ निष्ठावंत समाजसुधारक व ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नारायनजी ( पिन्टू भाऊ ) दुनेदार यांनी घेतले,,,,!!

श्री हनुमान पंच कमिटी सत्यमनगर कापसी खुर्द येथील ताना पोळ्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत राहावी ही संकल्पना ज्ञानीमनी ठेवून सत्यमनगर येथील समस्त ग्रामवासीयांनसह सर्वच नवयुकांनी तसेच जागृती महिला बचत गट, प्रगती महिला बचत गट, ममता महिला बचत गट, कविता महिला बचत गट, कल्याणी महिला बचत गट, तेजस्विनी महिला बचत गट, यांनी लाहान लाहान बालगोपालांना शिक्षण साहित्य वितरण करुन सर्वांनी मोलाचे सहकार्य केले,,,,!!