संजय कोंकमुट्टीवार यांच्या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड,स्टेट इनोवेशन अँड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र यांच्याकडून सन्मान.

0
206
1

अहेरी —स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय स्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धेत गडअहेरी येथील शाळेतील उपक्रमशील शिक्षक संजय कोंकमुट्टीवार यांनी सादर केलेल्या *नावीन्यातून गणित, शिकूया चार अंकांची किमया* या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली असून त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एस सी आर टी चे सहसंचालिका माननीय डॉक्टर शोभा खंदारे यांच्या शुभहस्ते व प्रसिद्ध साहित्यिक संजय जगताप, सकाळचे सोलापूर जिल्ह्यातील सकाळचे संपादक अभय दिवाणजी,योगेश सोनवणे बालभारतीचे सदस्य अजय कुमार लोडगे, लातूरच्या कलेक्टर वर्षा ठाकूर, सर फाउंडेशनचे संयोजक बाळासाहेब वाघ, सिद्धाराम माशाळे आणि राजकिरण चव्हाण आदींच्या उपस्थितीत देण्यात आला. या नवोपक्रमाची सर फाउंडेशन कडून राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.

राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी नवनवीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर करत आहेत. तसेच प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक व अधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना भावी तसेच सर्व स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धा स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र यांच्यातर्फे आयोजित केली जाते. यावर्षीच्या नवोपक्रम स्पर्धा मधील निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत गडअहेरी शाळेतील उपक्रम शिक्षक संजय कोंकमुट्टीवार यांच्या यांच्या *नाविन्यातून गणित, शिकूया चार अंकांची किमया* या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर नामांकन मिळाले असून त्यांना मिळालेल्या या उत्तुंग यशासाठी शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी कांबळे साहेब यांनी अभिनंदन केले आहे.