विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहा:मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांचे आवाहन…

0
112
1

अहेरी:अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत विविध पक्षातील नवनवीन चेहरे मैदानात उतरणार असून विरोधकांना धूळ चारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील सज्ज राहावे,असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

 

बुधवार ४ सप्टेंबर रोजी अहेरी येथील इंडियन फंक्शन हॉल मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्र बाबा आत्राम,सामाजिक कार्यकर्ते बबलू भैय्या हकीम,राकॉचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर,सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम,पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षावर्धन बाबा आत्राम,अहेरीचे माजी सरपंच रामेश्वर बाबा आत्राम,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष समय्या पसुला, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आशाताई पोहनेकर,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष सारिका गडपल्लीवार, इंदारमचे माजी सरपंच नामदेव आत्राम, राकॉचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार, सामजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार,पंचायत समितीचे माजी सदस्य सोमाजी झाडे,अहेरी नगर पंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,सिरोंचाचे नगरसेवक सतीश भोगे,नगरसेवक विलास सिडाम,महेश बाकीवार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पुढे बोलताना येत्या काही दिवसांत विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे.अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी एकच खुर्ची आहे.मात्र त्या खुर्चीसाठी प्रयत्न करणारे अनेकजण आहेत. आता प्रत्येकाला खुर्चीची ओढ लागली आहे.निवडणूक आली की सर्वजण बाहेर पडत आहेत.यंदा काही नवीन चेहरे देखील मैदानात उतरणार आहेत.लोकशाही असल्याने प्रत्येकाला संधी आहे.विरोधक बरेच ठिकाणी टीका करताना दिसत आहेत.काही लोकांनी तर आपली पातळी सोडली.मला पण बोलता येते,मात्र जरा धीर धरा.असा सूचक इशारा देताना त्यांनी आपला संपूर्ण राजकीय कार्यकाळच सांगितला .

 

७ वेळा निवडणूक लढवली आणि ४ वेळा आमदार म्हणून निवडून आलोय.तीन वेळा राज्यमंत्री तर यंदा कॅबिनेट मंत्रीपद मिळालं.राजे विश्वेश्वरराव महाराजांचा एक काळ होता.त्यांच्या इशाऱ्यावर लोकं चालायचे.१९९० मध्ये त्यांच्या विरोधात निवडणूक लढविली आणि जिंकून पण दाखविली. प्रवाहाच्या दिशेने तर सगळेच पोहतात पण प्रवाहाला चिरत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणारा नेहमीच लक्षवेधी ठरतो.मी पण तेच केला आणि त्यामुळेच आज तुमच्या पुढे उभा आहे. मी शांत आहे मला शांतच राहू द्या. वाघ जर डरकाळी फोडली तर शेळ्या, मेंढ्या धूम ठोकतील.असा इशारा देखील त्यांनी विरोधकांना दिला.

 

काही लोकं तर सण,उत्सवात देखील मंचावरून राजकारण करत टीका करीत आहेत.तश्या लोकांना न बोलतच त्यांचा तोंड बंद केला आहे.विकास कामांवर चर्चा करायची असेल तर आकडेवारी घेऊन समोरासमोर या असेही त्यांनी खुले आव्हान केले आहे.यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष रवींद्र बाबा आत्राम, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सामजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन करताना मिशन २०२४ साठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त प्राचार्य रतन दुर्गे तर सूत्रसंचालन सुरेंद्र अलोने यांनी केले.

 

*विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राकॉ मध्ये प्रवेश*

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत,पुष्पगुच्छ देत सर्वांचे स्वागत केले.