दानशूर राजेंनी केली 10000/-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत.!*
अहेरी:-* इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज हे आपल्या सामाजिक कार्यासाठी,आपल्या दानशूर वृत्तीसाठी तसेच प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या अडचणीत व संकटात सदैव तत्पर असा नेता म्हणून प्रसिद्ध आहेत.
अहेरी तालुक्यातील चिंचगुंडी येथील रहिवासी असलेली सौ.दुर्गुबाई बाना देवरवार वय-60 वर्षे हे गेल्या दोन वर्षांपासून गंभीर आजाराने ग्रस्त आहे.त्यांचं कुटूंब हे मोलमजुरी काम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत असतात.ते अनेक दिवसांपासून बिमारीने त्रस्त असल्याने कुटूंबातील आर्थिक अडचणी दिवसेन-दिवस वाढत आहेत.आणि बिमारीचा उपचारा करण्यासाठी आर्थिक मदतीची अत्यंत गरज असल्याने संपूर्ण कुटूंब चिंतेत होत.
ही या देवरवार कुटूंबाची व्यथा अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळताच त्यांनी तात्काळ देवरवार या कुटूंबातील सदस्यांना बोलावून त्यांची आस्थेने विचारणा केली व त्यांना मदतीचा हात देत.10000/-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत केली.
यावेळी देवरवार कुटूंबातील सदस्य तसेच स्थानिक राजे समर्थक उपस्थित होते.!