सखी मंच आलापल्ली-नागेपल्ली यांच्या तर्फे रक्षाबंधन व गोकुळ अष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..

0
25
1

*सखी मंच आलापल्ली-नागेपल्ली यांच्या तर्फे रक्षाबंधन व गोकुळ अष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.*

 

*अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांची विशेष उपस्थिती.!*

 

*रक्षासूत्र बांधणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना राखी निमित्य मायेची भेट म्हणून साडी वाटप!*

 

*अहेरी:-* तालुक्यातील आलापल्ली-नागेपल्ली येथील सखी मंच तर्फे रक्षाबंधन,गोकुळ अष्टमी सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज हे होते.त्यावेळी सखी मंच तर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी मंचावर मूक बधिर बालकांनी आपली कला सुंदर रीत्या सादर करून राजे साहेबांचे स्वागत केले.

 

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते म्हणाले निवडणुका येतील आणि जातील,पण आपल्या प्रत्येक अडचणी दूर करण्यासाठी हा तुमचा भाऊ तुमच्या सोबत सदैव असणार आहे असे मत यावेळी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी व्यक्त केले.

 

सखी मंचच्या सर्व सदस्यांनी राजे साहेबांना रक्षाबंधन निमित्ताने राखी बांधली,त्यावेळी राजे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणीना उपहार स्वरूपात ‘साडी’ भेट म्हणून दिली.राजे साहेब मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहोत असे मत यावेळी लाडक्या बहिणींनी व्यक्त केलं.तसेच राजे साहेबांनी मूक बधिर मुलांची अडचण जाणून घेत त्यांना आपल्या कडून 20 गाद्या भेट दिल्या.

 

यावेळ मंचावर आलपल्ली पेसा अध्यक्ष दीपक तोगरवर,सौ प्रमिलाताई फरकडे,वर्षाताई पेंपकवार,शालिनीताई पोहणेकर,किरण बोधनकर तसेच मुक बधीर शाळेचे शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सो.ठवकर ताईंनी,तर आभार सौ संगीताताई बुरांडे यांनी मानले.!