राजर्षी शाहू महाराज नगरातील ऐतिहासिक तान्हा पोळा उत्साहात साजरा

0
224

आमगाव – राजर्षी शाहू महाराज नगर येथे लहान मुलांचा तान्हा पोळा आयोजित करण्यात आला त्यात शिवसेना जिल्हाप्रमुख गोंदिया सुरेंद्र नायडू, तालुका कांग्रेस अध्यक्ष संजय बाहेकर, ईश्वर बहेकर, सामाजिक कार्यकर्ते महेश उके, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिति आमगाव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तम नंदेश्वर, शहराध्यक्ष रवी क्षीरसागर, राष्ट्रवादी कॉ. आमगाव, भोला गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस पाटील लोकचंद भांडारकर, पी.एच. पटले, माजी प्राचार्य व प्रशासक गायत्री शक्तीपीठ, आमगाव संतोष पुंडकर, उपाध्यक्ष, भवभूती रिसर्च अकॅडमी, आमगाव, एड, सुमित रामरामे, सामाजिक कार्यकर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी समाजसेवेतील अग्रेसर असलेल्या योगेश ईश्वरदास असाटी व अष्टविनायक गणेश उत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार समितीच्या वतीने सर्व मुलांना कराटे प्रशिक्षक हेमंत चावके यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या टीमसोबत आज सध्याचा काळ पाहता मुलींचे स्वसंरक्षण कराटेचे प्रात्यक्षिक करण्यात आले.व हेमंत चवके यांच्या संपूर्ण टीमला नगर महिला मंडळातर्फे ढाल देऊन गौरविण्यात आले.

सुरवी राकेश ब्राह्मणकर यांना प्रथम पारितोषिक 4444 रुपये, महेक पाथोडे यांना 3333 रुपये तर तृतीय पारितोषिक 2222 रुपये उत्कृष्ट नंदी सजावटीसाठी देण्यात आले.यावेळी समितीच्या वतीने 51 रोपांचे वाटप करण्यात आले.

अष्टविनायक गणेश मंडळ व राजर्षी शाहू महाराज नगर तर्फे लहान मुलांना विशेष भेटवस्तू देण्यात आल्या.
समितीच्या वतीने राजेश सातनूरकर, तनु येवले, भरतलाल राणे, राधे रहांगडाले, सुनील ढावरे, रमेश चौहान, प्रफुल्ल मेंढे, संजय ढगे, नारायण मेश्राम, अमित पाथोडे, चंद्रप्रकाश राय, प्रभाकर येवले, वालु येवले, पन्नालाल बहेकार, मोतीलाल रहांगडाले, भांडारकर, राजेश डोये, मंगल पिपरोल, अक्षम येवले, जगनकुमार परतेती आदींनी प्रयत्न केले.

महिला मंडल सहयोगी मे सरिता सातनूरकर, आरती रहांगडाले, पुष्पा ढवरे, सरिता येवले, ममता रहांगडाले, चौहान मेडम, रिकी येवले, भारती राणे, सोनू पाथोडे, परतेती मेडम, शुभांगी मेंढे, प्रमिला मेश्राम, केसरबाई डोये, ढगे मेडम, ज्योती येवले, प्रतिभा येवले आदि कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संयोजन राजेश सातनूरकर यांनी केले.

संचालन सुनील ढवरे व आभार प्रदर्शन शुभांगी मेंढे यांनी केले.

Previous articleविद्या निकेतन कनिष्ठ महविद्यालयात शिक्षक दिन साजरा
Next articleधानोली-बाम्हणी रस्त्यासाठी शेवटी नागरिकांनी स्वीकारला उपोषणाच्या मार्ग