धानोली-बाम्हणी रस्त्यासाठी शेवटी नागरिकांनी स्वीकारला उपोषणाच्या मार्ग

0
2328

अनिश्चितकालीन आमरण उपोषण आजपासून…

सालेकसा/ बाजीराव तरोने

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील तिरखेडी जिल्हा परीषद क्षेत्रातील धानोली-बाम्हणी हा जोड रस्ता या क्षेत्रातील लोकांकरिता अत्याधिक महत्त्वपूर्ण झालेला आहे. सदर रस्ता नसल्याने ग्रामपंचायत धानोली, बाम्हणी, दरबडा, बोदलबोडी, नानव्हा, गिरोला, घोन्सी, पीपरटोला, भजेपार येथील नागरीकांना आरोग्य सेवा, शिक्षण, कृषि-माल विक्री, बाजारपेठ, सरकारी कामे इत्यादी करिता आमगाव-गोंदिया येणे-जाने करावे लागते. त्याकरिता येथे धानोली ते बाम्हणी ०४ किमी चा रस्ता असून सदर रस्ता आतापर्यंत बनलेला नाही. त्यामुळे या क्षेत्रातील लोकांना व शाळेकरी विद्यार्थ्यांना २५ किमीच्या फेरा करून वेळ आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. पुष्कळ वर्षापासून शासनाला व लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदन देऊन सुद्धा रस्ता तयार करण्यात दुर्लक्ष होत आहे.

         ….धानोली – बाम्हणी रस्ता….

नाईलाजाने परिसरातील लोकांनी एकत्र येऊन दि १०/०८/२०२४ ला धानोली गावात भव्य सभा घेण्यात आली व सभेत सर्वानुमते आंदोलनाचे मार्ग स्वीकार करण्याचे ठरविले. त्यानुसार वरील मार्ग प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत तयार करण्याकरिता आवश्यक ते कार्यवाही शासनाने २८/०८/२०२४ पर्यंत पूर्ण करून आम्हाला लेखी कळवावे अन्यथा या परिसरातील नागरिकांना उपोषण शिवाय पर्याय नाही याची सर्व जबाबदारी शासनावर राहील असे ही निवेदन प्रशासनाला नागरिकांनी दिले होते.
शेवटी आमरण उपोषणाचा मार्ग आज (दि.०५ सप्टेंबर) पासुन नागरिकांच्या सहकार्याने सूरू झाला.त्यात विशेषतः शामू मेश्राम, राहुल बघेले, अक्षय डोंगरे, होमेंद्र कटरे, जितेंद्र टेंभरे व उपस्थित आहेत.
धानोली-बाम्हणी रस्त्या संबंधित अनेकदा शासन प्रशासनाला मागणी करूनही याकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करत आहे. शेवटी नागरिकांच्या सहकार्याने या मागणीला घेऊन उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला जेव्हा पर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत आमचा अनिश्चितकालीन आमरण उपोषण सुरूच राहील.
  – शामु मेश्राम , उपोषक
उपसरपंच ग्रा. प. धानोली
Previous articleराजर्षी शाहू महाराज नगरातील ऐतिहासिक तान्हा पोळा उत्साहात साजरा
Next articleशिक्षक दिनी ११५ विद्यार्थी बनले शिक्षक व सांभाळली शाळा