सालेकसा तालुक्यात नवीन बसस्थानकाचे बांधकाम करण्याकरिता निधी मंजूर झाल्याने सदर बांधकाम करिता जागा निश्चित करण्यासाठी कळविले आहे. तसंच राज्य परिवहन महामंडळातील विभा. वाह. अधिकारी, रा.प. भंडारा, विभा अभियंता (स्था) रा.प. भंडारा यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असता नवीन बसस्थानक बांधकाम करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेली जागा विद्यार्थी व प्रवाश्यांच्या सोयीच्या दृष्टीकोनातून सुयोग्य असल्याने सदर जागा उपलब्ध करून देण्याकरिता विनंती केली आहे.
त्या अनुषंगाने सदर विषयावर बैठक चर्चा करण्याकरिता तहसिल कार्यालय सालेकसा येथे दिनांक ०६/०९/२०२४ रोजी दुपारी २.०० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व राजकीय पक्ष. पत्रकार संघ, सर्व समाज सेवी संस्था पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, खेळांडू मंडळ, सर्व नागरिकगण न चुकता सदर स्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.