दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिकेचे व्रत केले जाते. निर्जला व्रत करून विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात.
आज ६ सप्टेंबर रोजी तिथी असल्याने या दिवशी उपवास केला जाईल. तर पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ६.१० ते ८.३२ वाजेपर्यंत असेल.
हरतालिका पूजा साहित्य
वाळू, बेल पत्र, शमी पत्र, आंब्याची पानं, पांढरी फुलं, वस्त्र, तसंच सोळा झाडांची प्रत्येकी १६ पानं पुजेसाठी फुलं, तसंच सौभाग्याचं साहित्य म्हणजेच बांगड्या, काजळ, कुंकू, चंदन, तूप, तेल, कापूर, साखर, दुध, मध, दही म्हणजेच पंचामृत, चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी,आरसा इ.