गोंदिया : शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024-25 करिता धान खरेदी करण्याकरिता शासनाकडून आधारभूत किंमती हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. धान उत्पादन शेतकऱ्यांकरिता FAQ दर्जाचे धान यांची सर्वसाधारण आधारभूत किंमत रुपये क्विंटल 2300 तर ग्रेड “अ” धानाकरिता 2320 रुपये हमीभाव निश्चित करण्यात आला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादन शेतकऱ्यांनी धान पीक पेरा हा सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवावा. यासाठी ऑनलाईन सातबारा करण्याकरिता सातबारा उत्पन्नावर धान पिकाची नोंदणी करण्याकरिता ऑनलाईन नोंदणी होणे आवश्यक आहे. यासाठी धान उत्पादन शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी धान खरेदी केंद्रावर धान पीक पेरा असलेल्या सातबारा उतारा देणे सोयीचे होईल असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

