अकोला जिल्हयातील पोलीस ब्वाईज संघटनेच्या आंदोलना ला गोंदिया शाखेचा जाहिर पाठिंबा

0
244
1

गोंदिया : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना अकोला जिल्ह्याच्या वतीने , अकोला जिल्हयातील पोलीस बांधवांच्या अनेक वर्षापासून शासन दरबारी प्रलंबितअसलेल्या हक्काच्या मागण्या त्वरित मंजूर करुन ‌त्यांच्या समस्यांचे तातड़ीने निराकरण करण्यात यावे यासाठी संघटनेचे तडफदार विदर्भ अध्यक्ष आशुतोष चव्हाण ,जिल्हाध्यक्ष अक्षय वानखडे आणि समस्त महाराष्ट्र पोलीस बाइज संघटना 3 सप्टेंबर 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आमरण उपोषण करीत असून त्यांच्या आमरण उपोषणाला अनेक संघटनांचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे. ‌ ‌ ‌‌ अकोला जिल्हयातील पोलीस बांधवांच्या मागण्या मंजूर करवून घेण्यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले शासन दरबारी प्रयत्नशील असून महाराष्ट्र पोलीस ब्वाईज संघटना गोंदिया जिल्ह्याच्या व तालुक्याच्या समस्त पदाधिकार्यांनी देखील पोलीस बांधवांच्या न्याय हक्कासाठी पुकारलेल्या आमरण उपोषणाला पूर्णपणे पाठिंबा जाहीर करून वेळ पडल्यास गोंदिया येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना द्वारा तीव्र आंदोलन प्रारंभ केला जाईल असे राहुल वंजारी जिल्हाध्यक्ष गोंदिया आणि संतोष पुंडकर, विदर्भ मिडिया प्रमुख यांनी जाहिर केले.

Previous article…..रसत्याने जात असताना झाड़ पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यु
Next articleके.के.इंग्रजी प्रायमरी शाळा आमगाव येथे शिक्षक दिवस आनंदात साजरा