आमगांव : दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोज गुरुवारला के.के.इंग्रजी प्रायमरी शाळा आमगाव येथे मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या प्राचार्या श्रीमती रीना भुते ,शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या दिनानिमित्त विद्यार्थी शाळेत शिक्षक बनून आपल्यापेक्षा खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या जागी तासिका घेतल्या व शिक्षक होण्याचे अनुभव घेतले. त्यानंतर शाळेत वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यात विद्यार्थ्यांनी सक्रिय भाग घेतला. तसेच प्राचार्या श्रीमती रीना भुते यांनी या दिवसाचे महत्त्व तसेच डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. त्यानंतर सगळ्यांना प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

