शिक्षकांवरील आस्था व विश्वासच, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे द्वार मोकळे करू शकते

0
172
1

_से.नि.प्राचार्य खुशाल कटरे यांचे प्रतिपादन

गोंदिया : युगाची वाटचाल यांत्रिक युगाकडून संगणक युगाकडे होत आहे.
वर्तमान परिस्थितीत, ज्ञान देणारे बरेचसे साधने उपलब्ध आहेत.
कोव्हीड काळात शाळा,महाविद्यालये शासनाच्या वतिने या रोगाचा संसर्ग टाळण्या करीता बंद करण्यात आले होते.त्या दरम्यान शिक्षण विभागांनी ऑनलाईन अभ्यासाचे,विद्यार्थ्यांना आवाहन केले होते.या अनुसंगांनी
विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक अॅप च्या मदतीने ज्ञान अर्जन करण्याचा प्रयत्न केला होता.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात ऑनलाइन अभ्यास पुरेसा होऊ शकतो का?
ऑनलाईन अभ्यास ऑफलाईन अभ्यासाचा विकल्प होऊच शकत नाही,
हे बर्याच पालकांच्या प्रतिक्रियेवरून ठरविता येऊ शकते.
विद्यार्थी ज्या शिक्षकांकडून विषयाचा अभ्यास करतो, तो विषय पुर्णतः समझण्यासाठी ,त्या शिक्षकांवर त्या विद्यार्थाची श्रध्दा,आस्था,निष्ठा व विश्वास असने गरजेचे आहे.
असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य खुशाल कटरे यांनी केले.
गुरूवार ता.5 सप्तेबंर रोजी श्री.शारदा वाचनालय गोंदिया च्या वतिने आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी श्री.शारदा वाचनालय व्यवस्थापनाचे अध्यक्ष गोंविदराव बजाज विराजमान होते.

मा.कटरे पुढे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी नियमीत व्यायाम, वेळापत्रकानुसार अभ्यास,अभ्यासातील सातत्य तथा विविध प्रकाशनाद्वारे प्रकाशित संदर्भ पुस्तिंकाचा वापर करून विषयाचा अभ्यास करावा.यश आपल्या पदरी पडल्याशिवाय राहणार नाही.
प्रस्तुत कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक व आभार वाचनालय प्रमुख शिव शर्मा यांनी केले.
या कार्यक्रमात विविध अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.