वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-गजानन पोटदुखे
दिनांक :-7 सप्टेंबर 2024
फ्रेंड्स क्लब धामणगाव प्रथम, तर द्वितीय पुरस्कार वीर भगतसिंग क्लब सरकापूर.
देवळी शहरात विश्व हिंदू परिषद बजरंग दल द्वारा आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव निमित्य दहीहांडी स्पर्धा बुधवार ४ सप्टेंबर रोजी आठवडी बाजार पटांगणावर स्पर्धा घेण्यात आली.या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खा.रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांच्यासोबत मंचावर प्रमुख उपस्थिती भाजपा नेता राजेश बकाने,समाजसेवी मोहन अग्रवाल,ठाणेदार महेश चव्हाण, भाजप नेता पृथ्वी शाह,अटल पांडे,बबलू राऊत,अनिल कावळे,डॉ.नरेंद्र मदनकर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
उपस्थित पाहुण्यांनी सर्व देवळी नगरवासीयांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊन दहीहांडी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व आपापले मत व्यक्त केले.यावेळी आठवडी बाजाराच्या पटांगणावर प्रेक्षक महिला पुरुषांनी भरपूर गर्दी केली होती.या दहीहांडी स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार ५१ हजार रुपये रोख व चषक तर द्वितीय पुरस्कार ३१ हजार रुपये रोख व चषक ठेवण्यात आले होते.या अत्यंत अतितटीच्या स्पर्धेत फ्रेंड्स क्लब धामणगाव विजेता ठरला याला ५१ हजार रुपये रोख व चषक देण्यात आले तर द्वितीय पुरस्काराचे मानकरी वीर भगतसिंग क्लब सरकापुर यांना ३१ हजार रुपये रोख व चषक देण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन मोहन जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन महल्ले यांनी केले या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी दिनेश शिरसागर,मोहन जोशी,गोल्डी बग्गा,संजय कांमडी,प्रवीण तेलरांधे,अनिल शिरसागर,अमोल गोडबोले,गजानन मेंडुले,शुभम कांमडी,अनिकेत मरघाडे,प्रफुल येळणे,मोहन चावके,आकाश फटिंग,भारत पांडे,सुरज सेलवटे, अक्षय पंचभाई,विकी खंडाळे, हरिश तेलरांधे,पंकज जबडे, ऋषिकेश ढोक,युवराज चकोले, शुभम क्षीरसागर,आदी लोकांनी प्रयत्न केले.