आमगाव : तालुक्यातील गोरठा जि.प. क्षेत्रातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा जामखारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंगी, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पिंपरटोला (धा), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिपरटोला (खुर्द) येथे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एड. दुष्यंत नामदेव किरसान यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
उपरोक्त कार्यक्रमात प्रमुख अतिथी मा.ईसुलाल भालेकर सचिव जिल्हा कांग्रेस कमेटी गोंदिया, मा.महेश ऊके संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती, मा युवराज कटरे,मा. डीलेस्वर कटरे, मा. रमेश बावनकर पोलीस पाटील जामखारी, मा. सुशीलजी पाऊलझगडे मुख्याध्यापक जामखारी, मा राजेश मच्छीरके उपसरपंच सावंगी, मच्छीरके माजी सरपंच पिपरटोला, मा.रामदास रामटेके, बहेकार सर, केसाळे सर व शिक्षक उपस्थित होते.