जन ग्रामीण पत्रकार संघाच्या गडचिरोल्ली जिल्हाध्यक्ष पदी श्रावण जगन्नाथ वाकोडे यांची नियुक्ती

0
81
1

उपाध्यक्ष पदी हस्ते भगत, सचिव पदी भास्कर फरकडे

गडचिरोल्ली;-जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे जिल्हाध्यक्ष शैलैंद्र साळे यांच्या सुचनेनुसार नुकतीच निवड प्रक्रिया नागपूर येथील रविभवन येथे पार पडली. जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे, राज्य कार्याध्यक्ष युवराज देवरे, राज्य जनसंपर्क प्रमुख प्रतिक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 6 सप्टेंबर रोजी रवी भवन येथे झालेल्या या निवड प्रक्रियेत जिल्हाध्यक्ष पदी श्रावण जगन्नाथ वाकोडे तर उपाध्यक्षपदी हस्ते गजानन भगत, तर सचिव पदी भास्कर फरकडे यांची नियुक्ती विदर्भ समन्वय सुरजीत सिंग बाट,नागपूर जिल्हाध्यक्ष प्रतिक पांडे, नागपूर जिल्हा सचिव सचिन बैस, उपाध्यक्ष नागपूर जिल्हा दुर्गा प्रसाद बर्वे, यांच्या उपस्थितीत करण्यात आली या निवडीचे नियुक्ती पत्र नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रतिक पांडे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.यावेळी नागपूर जिल्हाध्यक्ष प्रतिक पांडे व उपस्थित मान्यवरांनी श्रावण वाकोडे, हस्ते भगत भास्कर फरकडे यांचे आदिंनी अभिनंदन केले.अन्याय अत्याचार रोखण्यासाठी व संघटना वाडीसाठी मी गडचिरोली जिल्यात प्रयत्न करणार असे जन ग्रामीण पत्रकार संघ रवी भवन येथे अध्यक्ष श्रावण वाकोडे उपाध्यक्ष, हस्ते भगत सचिव भास्कर फरकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुढील वाटचाली साठी उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिले आहे,