आलापलीच्या मुख्य चौकात युवकावर चाकू हल्ला…. युवक जखमी 

0
742

गडचिरोली /अमोल कोलपकवार

आज गणेश चतुर्थीच्या शुभ पर्वावर सर्व आलापल्ली कर भक्तिमय वातावरणात लिंन होत असतानाच आलापलीच्या मुख्य चौकात दुपारच्या सुमारास थरारक घटना घडली. आलापल्ली येथील मुख्य चौकातील व्यावसायिक साई रापत्तीवार व अजय चौधरी यांच्यात किरकोळ वाद झाला. वादाचा रूपांतर हाणामारीत झाला. व मधात वाद सोडवण्यासाठी आलेल्या दुकानात काम करणारा युवक निखिल गुरूनले या युवकावर अजय चौधरी नावाच्या युवकाने चाकू हल्ला करत त्याला जखमी केले. जखमी निखिल गुरूनुले या युवकाला तात्काळ नजीकच्या सलुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले जखमीवर उपचार सुरू आहे. अहेरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक स्वप्निल इजिपवार यांनी घटनेची तात्काळ दाखल घेत घटनास्थळी पोहोचले. असून पुढील तपास अहेरी पोलीस करत आहेत.