खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या प्रयत्नांना यश,कोरोना काळात बंद झालेली वडसा-चांदाफोर्ड, चांदाफोर्ड – गोंदिया रेल्वे पुर्ववत सुरू.

0
120

 

*8 सप्टेंबर रोजी खासदार किरसान यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून ट्रेन होणार रवाना*

 

गडचिरोली : कोरोना महामारी मुळे बल्लारशहा – गोंदिया रेल्वे मार्गांवरील अनेक गाड्या बंद करण्यात आल्या. कोरोना जाऊन काळ लोटला असला तरी बऱ्याच रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या नसल्याने अनेक प्रवाशांना त्याचा त्रास होत होता. त्यामध्ये वडसा – चांदाफोर्ड, चांदाफोर्ड – गोंदिया रेल्वेगाडीचा समावेश होता, वारंवार मागणी करून देखील बंद रेल्वे पूर्ववत सुरु करण्यात आली नसल्याने. या संदर्भात गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात वडसा – चांदाफोर्ड, चांदाफोर्ड – गोंदिया रेल्वे पूर्ववत सुरु करण्याची मागणी केली. अखेर खासदार डॉ. किरसान यांच्या प्रयत्नाना यश आले असून कोरोना काळात बंद झालेली वडसा-चांदाफोर्ड, चांदाफोर्ड – गोंदिया ही रेल्वे पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. सदर रेल्वे 8 सप्टेंबर 2024 पासून नियोजीत वेळेवर धावणार असून यामुळे सदर मार्गांवर प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवास्यांना सोयीचे होणार आहे. 8 सप्टेंबर 2024 रोजी, वडसा रेल्वे स्थानकावर सकाळी 7.15 मिनिटांनी खासदार डॉ. नामदेव नामदेव किरसान सदर रेल्वे ला हिरवी झेंडी दाखविणार आहेत.

Previous articleआम्ही जागरूक महिला, करूया ‘इको फ्रेंडली’ हरितालिका …!
Next articleशिक्षक दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व शिक्षक सत्कार