अहेरी जिल्हा बनविण्याचा संकल्प घेऊन निवडणुकीचा तयारीला लागा -राजे अम्ब्रीशराव महाराज,सिरोंचा येथे पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न, तुडुंब जनतेने केले राजेंचे जंगी स्वागत.

0
84
1

 

*सिरोंचा:-* माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा अहेरी, एटापल्ली, मूलचेरा, भामरागड तालुकानिहाय बैठका घेतल्या, सर्वच तालुक्यात भाजपाचे प्रमुख पदाधिकारी ते सामान्य कार्यकर्त्ते राजेंंच्या बाजुने भक्कमपणे साथ देतांना दिसत आहे. सिरोंचा येथे काल केवळ पदाधिकारी, कार्यकर्तेच नाही तर सर्वसामान्य जनतेनी सुध्दा राजे साहेबांचे ऊत्स्फुर्त, अभुतपुर्व स्वागत केले. तालुक्यातील कानाकोपर्‍यातुन आलेल्या जनतेच्या मोठ्या संख्येने स्वयंस्फुर्त हजेरीमुळे पदाधिकारी बैठकीचे रुपांतर जवळपास जाहीर सभेतच झाले. राजे साहेब काय बोलणार? आगामी निवडणुकीत काय भुमिका घेणार हे जाणुन घ्यायला तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावातून चाहतावर्ग ऊपस्थित झाला होता..!!

 

ऊपस्थित झालेल्या जनतेला मार्गदर्शन करतांना राजे मनाले आपल्या कारकीर्दीत मोठमोठी अशक्यप्राय कामे करुन दाखविली होती, नवीन *अहेरी* जिल्ह्याची निर्मिती करणे हे माझे स्वप्न असून वेळ आल्यास त्यासाठी रस्तावरही उतरायला मी तयार आहे, अहेरी जिल्ह्याच्या निर्मीतीचे काम सुध्दा अंतिम टप्प्यात आले होते परंतू मागील विधानसभा निवडणुकीतील निकालामुळे ते मागे पडले, आगामी काळात प्राधान्याने हा विषय मार्गी लावणार असल्याचे शब्द दिले तसेच हाच संकल्प घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीचा तयारीला लागा असे आवाहन ह्यावेळी राजेंनी केले तसेच कोणत्याही आमिषांना बळी न पडता विकासाचा आणि भवितव्याचा विचार करावा आणि त्यांच्या कारकिर्दीत ह्या क्षेत्रात केलेल्या विकासकामांचा पाढाच राजेंनी वाचला त्याकाळात तालुक्यातील सर्वच भागात अभुतपुर्व विकासकामे झालीत मात्र गड्डे बुजवणार असे पोकळ गर्जना करणार्‍यांनी आत्ता रस्ताच शिल्लक कुठे ठेवला नसल्याचा टोलाही मारला..!!

 

*रेती,तेंदु व इतर सर्व ठेकेदारी कुटूंबीयांना हवीत*

 

विकासकामांची कंत्राटे, तेंदूपत्ता, रेती इ. सर्वांची ठेकेदारी मंत्री साहेबांचे कुटूंबीयच करतांना दिसतात हाच विकासाचा माॅडेल होता काय? असा खोचक सवाल ही केला.

 

*खुर्चीची लालसा संपतच नाही*

 

मंत्री साहेबांनी कित्येक निवडणुका हीच शेवटची निवडणूक असे सांगत लढविल्या आणि आज मंत्रिपदही ऊपभोगायला मिळाले. मुलीला संधी देणार असल्याचे वारंवार सागुन शेवटी स्वतःच ऊभे राहणार असल्याची घोषणा करतांना सत्तेचा मोह दिसतो.जनतेचे भले व्हावे,परिसराचा विकास व्हावा याचे मात्र सोयरसुतक त्यांना नाही अशी टिका राजेंनी ह्यावेळी केली, ह्या कार्यक्रमाला सिरोंचा तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!