अष्टविनायक परिवार तर्फे रक्तदान शिबिर मध्ये युवकांचा स्फुर्तपणे सहभाग

0
252
1

# ५२ युवकांनी केले रक्तदान…
# सामाजिक कार्याची २६ वर्षाची परंपरा…

आमगाव : अष्टविनायक परिवार आमगाव यांच्या द्वारे श्री गणेश स्थापनेच्या पहिल्याच दिवशी रक्तदान शिविराचे आयोजन करण्यात आले.यावेळी ५२ रक्तदात्यानी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग घेतला.
अष्टविनायक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने श्री गणपती स्थापनेच्या पहिल्याच दिवशी सामाजिक कार्याची प्रेरणा देणारे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
यावेळी सामाजिक व राजकीय पुढाऱ्यांनी हजेरी लावून रक्तदात्यांचे अभिनंदन करीत प्रोत्साहन दिले. रक्तदान शिबिर अष्टविनायक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने श्री गणपती स्थापनेच्या पहिल्याच दिवशी सामाजिक कार्याची प्रेरणा देणारे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन यावेळी प्रमुख अतिथी सहायक पोलिस निरीक्षक निलेश डाबेराव,पोलिस उपनिरीक्षक निळकंठ गित्ते ,आरोग्य भारती आमगाव चे अध्यक्ष रितेश अग्रवाल, रोहित गुप्ता, डॉ श्रेष्ठ जायस्वाल, गुड्डू शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक व राजकीय पुढाऱ्यांनी हजेरी लावून रक्तदात्यांचे अभिनंदन करीत प्रोत्साहन दिले. रक्तदान शिबिर मधे गंगाबाई शासकीय रक्त बँक येथील अमित ठावरे,विजय बिसेन, डॉ.विहानका वैद्य, डॉ.अजिंक्य चांदेकर, श्रिरिष,गणेश हूले,प्रतीक बंसोड,इस्वर चुटे यांनी रक्त संकलन केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश कोसरकर,उमेश चतुर्वेदी,यशवंत मानकर यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग घेतला.
रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी अष्टविनायक परिवार सदस्यांनी सहकार्य केले.यावेळी ५२ रक्तदात्याणी रक्तदान केले.
अष्टविनायक परिवार तर्फे मागील २६ वर्षाची सामाजिक कार्याची प्रेरणा ही नगरात नावाजली आहे.त्यांच्या प्रत्येक कार्यात नगरातील युवक स्वयस्फुर्तपणे सहभागी होऊन योगदान देतात.
यावर्षी अनेक सामाजिक कार्याची अनेक उपक्रम राबविले जात आहेत.त्यांच्या या कार्याला प्रत्येक घटकाकडून कौतुक करण्यात येत आहे.