सहजयोगाच्या माध्यमातून अध्यात्मिक उन्नती प्राप्त करता येते-राजे अम्ब्रिशराव महाराज.

0
221
1

*आलापल्ली येथे भक्तिमय वातावरणात सहजयोगाची श्रीगणेश पूजा संपन्न.*

 

*अहेरी:-* परम पूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहजयोग ध्यान साधना केंद्र हे अहेरी विभागातील अनेक गावांमध्ये आहेत.ज्या मध्ये साधक(सहजयोगी) ध्यान साधनेसाठी मोठया संख्येने सहभागी होत असतात.आणि आपली अध्यात्मिक प्रगती करण्यासाठी ध्यान साधना करतात.

 

सहजयोग ध्यान साधना केंद्र अहेरी विभागाची श्रीगणेश पूजा आलापल्ली येथील परमेश्वरी कन्यका मंदिर येथील हॉल मध्ये आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी या पूजा महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज हे होते.त्यावेळी सहजयोग ध्यान केंद्र कमिटी तर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी राजे साहेबांनी मोठ्या श्रद्धेने श्री माताजी निर्मला देवी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आशीर्वाद घेतले.

श्रीगणेश पूजा स्थळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले परम पूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहजयोग ध्यान साधना केल्याने आपण आपल्या जीवनातील ताण-तणावापासून मुक्त होतो.आपल्यामध्ये व्यक्तिमत्त्व विकास होतो,आपलं जीवन सुखी व समाधानी होते आणि सहजयोगाच्या माध्यमातून अध्यात्मिक उन्नती प्राप्त करता येते असे मत यावेळी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी व्यक्त केले.

 

श्रद्धा व भक्तिमय वातावरणात सहजयोगाची श्रीगणेश पूजा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.त्यावेळी सहजयोग अहेरी विभागाचे प्रमुख श्री.राजुजी तेलामी,सौ.ज्योतिताई ताजने,चक्रधर कावळे,अनिल अनमूलवार,शिवराज ताजने,गणेश गारघाटे,जम्पलवार तसेच भामरागड,एटापल्ली,मूलचेरा,आलापल्ली,आष्टी आणि सिरोंच्या येथील सहजयोग ध्यान केंद्र प्रमुख तसेच मोठ्या संख्येत साधक(सहजयोगी) उपस्थित होते.!