Orange Alert : पुजारीटोला धरणात पाणी पातळी वाढल्याने १३ दरवाजे उघडले..

0
3194
1

गोंदिया : आज दि.१० सप्टेंबर रोजी पुजारीटोला धरणाच्यां पाणी पातळीत वाढ होत आहे त्यामुळे धरण सुस्थीतीत/ नियंत्रणाकरीता जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे धरणाचे गेट सुरू करुन ( सर्व १३ वक्रदवार दरवाजे) ३.६० मी. ने उघडण्यात आले आहे. यामधून २६२१ क्युमेक (९२५४८ क्युसेक ) विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

तरी नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवा-गमन करणाऱ्या सर्व संबंधीतानी स्वतः ची काळजी बाळगावी असा सतर्कतेचा ईशारा देण्यात येत आहे.(सोडण्यात आलेला विसर्ग मोठे प्रमाणत आहे)
जलाशयात येणारा येवा पाहून जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे.
कोणत्याही नागरिकास काही अडचण आढळून आल्यास जिल्ह्याच्या खालील दिलेल्या मदतकेंद्र क्रमांकावर संपर्क करावा.
सर्व यंत्रणांनी आवश्यक ती संपुर्ण खबरदारी बाळगून सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या स्तरावरुन तसे सर्व संबंधितांना त्वरित सुचीत करावे.
०७१८२ – २३०१९६ ; ९४०४९९१५९९ 
आजची जलाशय पातळी : ३१८.२२ मी.
उपयुक्त पाणीसाठा :  ४०.२०२ दलघमी
उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी : ९२.३६ %
विसर्ग २६२१ क्यूमेक्स ( ९२५४८ क्युसेक )पर्यंत विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.