वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-गजानन पोटदुखे
दिनांक :-10 सप्टेंबर 2024
देवळी : येथील बस स्टॉप परिसरात दि.9 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता च्या दरम्यान बसची वाट पाहत असणाऱ्या वृद्ध महिला मृतक ज्योतीबाई वसंतराव चांदुरकर वय (55) रा. वायफड याचा MH 20 BL 2295 किनवट आगार या एसटी बस मागे घेत असताना अचानक धक्का लागून पडल्या . त्याच्या पायाला आणि कमरेच्या काही भागाला एसटीच्या चाकाचा जबर मार लागला. त्या त्याना गंभीर दुखापत झाली.त्याच्या पाय मोडला गेला.परिसरातील नागरिकांनी आणि देवळी बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी त्वरित ॲम्बुलन्स बोलून त्यांना उपचाराकरिता सेवाग्राम येथे हलविण्यात आले.
महिला वयोवृद्ध असल्यामुळे आणि त्यांना जबर मार लागल्यामुळे त्यांचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. विनोद कौडूजी सारजे रा. बकाने ले आऊट, देवळी यांच्या तक्रारीवरून बसचालक चंदू धर्माजी सलामे यांच्या विरोधात देवळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास देवळीचे ठाणेदार महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात देवळी पोलीस करीत आहे.

