
मुसळधार पाऊसामुळे पुजारीटोला धरणाचे आज सकाळी 5 वाजता सर्व वक्रदार 13 दरवाजे उघडण्यात आले.यामधून 92548 क्यूसेक विसर्ग वाघनदी नदीपात्रात सोडल्याने आमगांव लांजी (मध्यप्रदेश) महामार्गावर शहरातील कामठा चौकपासून दोन किमी अंतरावर शंभुटोला रसत्यानच्या वळणावर वाघनदी पुलाच्या कड़ेला रसत्यावर जवळ जवळ चार फुट पाणी असल्याने वाहतूक विसकळीत झाली आहे. वाटसरूच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे.

