भंडारा /प्रतिनिधी
आपण जागृत होवूयात, आपले अधिकार मिळवूया या संकल्पनेतून आज दि.१०/०९/२०२४ ला भंडारा जिल्ह्यातील सुकळी नकुल येथे ग्रामसभेविषयी ७ दिवसापूर्वी गाव नागरिकांना ग्रामपंचायत नोटीस फलक, लाऊड स्पीकर व सोशल मीडिया या द्वारे सूचना देण्यात यावे यासाठी आर. पी. मेश्राम ग्रामसेवक सुकळी नकुल यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले. निवेदन देताना टानेश्र्वर तुरकर, टेकेश्वर पटले, दुर्गेश काळसर्पे, जितेंद्र नेवारे, अमोल आंबेडारे, मारोती गोंडाणे व सर्मिंदगोंडाणे, सुनील कोहळे यांच्या द्वारे निवेदन देण्यात आले.

