अहेरी विधानसभा निवडणूक : कार्यकर्ते आणि मतदारांची बल्ले बल्ले ..

0
254
1

अहेरी विधानसभा निवडणूक : कार्यकर्ते आणि मतदारांची बल्ले बल्ले

गडचिरोली /अमोल कोलपाकवार

विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रात काही विधानसभा क्षेत्र अशी आहेत की ज्यावर संपूर्ण राज्याचे लक्ष आहे त्यातच एक महत्त्वाचा विधानसभा क्षेत्र म्हणजे अहेरी विधानसभा क्षेत्र हा विधानसभा क्षेत्र अनेक कारणांनी महाराष्ट्रात नावाजला आहे अलीकडे तर पिता-पुत्रींच्या बंडामुळे हा विधानसभा क्षेत्र महाराष्ट्रात चर्चिला जात आहे.या विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हेवीवेट नेते कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा अनेक वर्षापासून दबदबा आहे गेली पन्नास वर्षापासून हे या विधानसभा क्षेत्रात सक्रिय आहेत सध्या ते राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत सहाजिकच त्यांचा या विधानसभा क्षेत्रावर दबदबा आहे. यावेळेस पुन्हा आपले नशीब आजमावण्यासाठी ते सज्ज आहेत परंतु यावेळी त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत उडी घेतल्यामुळे धर्मराव बाबा आत्राम यांची नक्कीच अडचण वाढणार आहे. दुसरीकडे त्यांचे पुतणे राजे अमरीशराव आत्राम हे सुद्धा भाजपची तिकीट मिळो अथवा न मिळो आपण निवडणूक लढणारच या मतावर ते ठाम आहेत त्यानुसार त्यांचे जनसंपर्क दौरे ठीक ठिकाणी सुरू आहेत त्यामुळे ते नक्कीच मोठे मत घेतील यात काही शंका नाही तर दुसरीकडे मात्र काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत आघाडी घेतल्यामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार हे हनुमंतू मळावी या नवख्या उमेदवाराला मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. तर काँग्रेसमध्ये सुद्धा दक्षिण गडचिरोलीत सिरोंचा मध्ये माजी आमदार पेंटा रामा तलांडी यांची सुद्धा निवडणूक लढण्याची शुद्ध इच्छा आहे असे बोलले जाते . दुसरीकडे माजी आमदार दीपक दादा आत्राम हे सुद्धा शांत बसणार नाही. ते सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यात तिसऱ्या आघाडीचे सुद्धा संकेत मिळत आहेत. त्यामुळे मुख्य पक्षात नाराज झालेल्या आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांची गर्दी वाढणार आहे. सीट एक आणि उमेदवार अनेक अशी परिस्थिती अहेरी विधानसभा क्षेत्रात येऊन ठेपली आहे. एकंदरीत या विधानसभा क्षेत्रामध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा खेळ चालेल असेही काही लोकांचे म्हणणे आहे. निवडणूक म्हटले की कार्यकर्ते आणि मतदारांची मात्र चांदी असते यावेळेस चारही पक्षाकडून कार्यकर्त्यांना लक्ष्मी दर्शन होण्याचे चिन्ह दिसत आहे. मतदार मात्र ज्याला मत द्यायचे त्यालाच देईल. परंतु एक मात्र नक्की या भानगडीत कार्यकर्ते आणि मतदारांची मात्र अशा निवडणुकीत मजाच मजा असते.