
सिरपुर धरणाचे पाच दरवाजे सुरु…
कालिसराड धरणाचे सर्व दरवाजे बंद…
न्यूजप्रभात वृत्तसेवा
आमगांव : गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा व देवरी तालुक्यातील सिरपुर, कालिसराड, व पुजारीटोला धरणा तिल पाण्याची पातळी कमी झालेली असून पुर परिस्थिति सामान्य आहे.
दि. 11/09/2024 ला 7.30 वाजता पुजारीटोला धरणाच्यां पाणी पातळीत झाली आहे त्यामुळे धरण नियंत्रणाकरीता जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे धरणाचे गेट सुरू करुन 08 वक्रदवार 0.30 मी. ने उघडण्यात आले आहे. यामधून 6323 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
सिरपूर धरण
आज दि. 11/09/2023 ला 7:00 वाजता सिरपूर धरणाच्यां पाणी पातळीत घट झाली आहे त्यामुळे धरण नियंत्रणाकरीता जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे धरणाचे वक्रद्वार सुरु करण्यात आले आहे 05 वक्रद्वार 0.30 मी. ने सुरू करण्यात आला आहे. यामधून 4441.26 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
कालिसराड धरण
आज दि. 11/09/2024 ला 4:00 वाजता कालीसरार धरणाच्यां पाणी पातळीत कमी झाली आहे त्यामुळे धरण नियंत्रणाकरीता जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे धरणाचे सर्व गेट बंद करण्यात येत आहे
तरी नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवा-गमन करणाऱ्या सर्व संबंधीतानी स्वतः ची काळजी बाळगावी असा सतर्कतेचा ईशारा देण्यात येत आहे.सोडण्यात आलेला विसर्ग सामान्य आहे.
जलाशयात येणारा येवा पाहून जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे.
कोणत्याही नागरिकास काही अडचण आढळून आल्यास जिल्ह्याच्या खालील दिलेल्या मदतकेंद्र क्रमांकावर संपर्क करावा. 07182-230196, 9404991599


