हरदोली (सि.) येथे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी कृणाल गजभिये

0
115

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले 

तुमसर तालुक्यातील हरदोली (सि.) येथे दिनांक ९ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समिती अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. या तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत कृणाल गजभिये व गुलाब पारधी हे दोन उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे होते. यावेळी निवडणूक प्रक्रियेत गुलाब पारधी यांना 59 मते तर कृणाल गजभिये यांना 70 मते पडली. यात कृणाल गजभिये हे 11 मतांनी विजयी होऊन हरदोली (सि.)तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. याप्रसंगी सरपंच संजना धुर्वे, उपसरपंच धर्मेंद्र कटरे, ग्रामपंचायत सदस्य खडकसिंह राणे, नरेश पाटील, प्रकाश भगत, नंदा वाढवे, सुनिता कटरे, संगीता नान्हे, जयश्री रहांगडाले, शारदा कोहळे, सचिव एन. ए. राठोड व गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleपुजारीटोला धरणाच्यां पाणी पातळीत घट ; आठ दरवाजे सुरुच…
Next articleगणेश विसर्जन दरम्यान महत्वाचे ठिकाणी बॅरीकेट्स व विद्युत प्रकाशाची व्यवस्था करावी