गणेश विसर्जन दरम्यान महत्वाचे ठिकाणी बॅरीकेट्स व विद्युत प्रकाशाची व्यवस्था करावी

0
305
1

 गोंदिया : ०७ ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. स्थापित सार्वजनिक तसेच खाजगी गणेश मुर्ती विसर्जन पाचवा दिवस ११ सप्टेंबर, सातवा दिवस १३ सप्टेंबर, आठवा दिवस १४  सप्टेंबर, नववा दिवस १५ सप्टेंबर, दहावा दिवस १६ सप्टेंबर तसेच अनंत चतुर्दशी दिवस १७ सप्टेंबर या दिवशी मोठ्या संख्येने गणेश मुर्तीचे विसर्जन होणार असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची तसेच लहान मुलांची गर्दी होण्याची शक्यता असून विसर्जन सायंकाळी व रात्रीचे वेळी होत असल्याने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, रहदारीस अडथळा निर्माण होवू नये या दृष्टीकोनातून महत्वाचे ठिकाणी बॅरीकेट्स व विद्युत प्रकाशाची व्यवस्था करण्यात यावी. असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी कळविले आहे.