१२५ वर्षाची परंपरा जोपासत मुरतकर परिवाराकढून ज्येष्ठा गौरीपुजन संपन्न….

0
243

वर्धा /प्रतिनिधी

वर्धा जिल्हातील समुद्रपुर तालुक्यातील देरडा येथील मुरतकर परिवारात १२५ वर्षाचा महालक्ष्मी पूजनाचे वारसा जपत संपूर्ण परिवारातील सदस्या आणि नातलग यांच्या उपस्थितीत सानंद संपन्न झाला.महालक्ष्मी पूजनाच्या १२५वे वर्ष निमित्ताने परिवारातील डॉ सुरेश मुरतकर, डॉ समीर मुरतकर,डॉ मृणाल मुरतकर यांनी गावातील लोकांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेत गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली व मुरतकर परीवारातील सुनील मुरतकर व धीरज मुरतकर यांनी रुग्णासाठी औषधांचा पुरवठा केला.त्याच प्रमाणे गावातील व परिवारातील सदस्यांनी वेगवेगळे खेळ खेळून आनंद साजरा केला.तसेच या प्रसंगी मुरतकर परिवारातील चार पिढ्या उपस्थित असल्या मुळे परिवारातील सदस्यांनी मनोगताच्या माध्यमातून परिवारातील महालक्ष्मी स्थापने पासून एकशे पंचवीस वर्षाच्या प्रवासाला उजाळा दिला.

Previous articleतिरोडा तालुक्यात भाजपला खिंडार, भाजपला रामराम ठोकत हाती घेतली तुतारी…!
Next articleरनेरा येथे तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुनील पाटील यांची बिनविरोध निवड