जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
तुमसर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या रनेरा येथे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सुनील पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.. दि. ११ सप्टेंबर ला ग्रामपंचायतची ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी ही निवड करण्यात आली. यावेळी सभेला सरपंच योगराज टेंभरे ,उपसरपंच संजीत उईके , पोलीस पाटील अजयसिंग बर्वे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पारधी, माजी उपसरपंच मनोहर कावळे,गंगाधर डोंगरे, ग्रामरोजगार सेवक प्रमोद आग्रे, राजू सुरजसे, संगणक परिचालक प्रकाश हेडाऊ, परिचर राजकुमार उईके, महेश पारधी, चरण खडसे, प्रशांत राखडे, सुरेश पारधी, मालिक पारधी, नरेश मडावी, आदी उपस्थित होते. यावेळी नव निर्वाचित तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुनील पाटील यांनी आपल्या निवडीबद्दल गावाकऱ्यांचे आभार मानले.

