वरुणराजा च्या साक्षीने शिवस्वराज्य यात्रेचे तिरोड्यात जल्लोसात स्वागत…
तिरोडा / सदानंद पटले
दि. १० सप्टेंबर २०२४, रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित शिव स्वराज्य यात्रा प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूबभाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितित अतिवृष्टि जन्य परिस्थित मोठ्या दिमाखात ड्रीम गार्डन लॉंन तिरोडा येथे पार पडली. यावेळी बिरसी फाटा येथे यात्रेनिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. बाइक रॅलीद्वारे तिरोडा नगर भ्रमण करत यात्रा मार्गस्थ होत मुख्य कार्यक्रम स्थळी पोहचली.
यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मार्गदर्शन करतांना संगितले की, सत्तेच्या स्वार्थासाठी गेलेले सगळेच “ आम्ही विकासासाठी गेलो” अस म्हणतात, जे गेले त्यांना पवारांनी अनेक वर्षे केंद्रीय मंत्रीपद दिले. तरीही त्यांनी संकटाच्या काळात त्यांची साथ सोडली. महाराष्ट्रचा इतिहास आहे की, इथे चुकीला माफी असते, मात्र गद्दारीला माफी नाही. असे प्रतिपादन केले.
पुढे कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शावर चालतो, याची अनुभूती महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस मतदान करून दाखविली आहे. स्वत;च्या स्वार्थासाठी काही नेत्यांनी आपल्या वडीलधारी माणसाचे हात सोडले. मात्र जे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत फोडाफोडीचे राजकारण करीत आहेत. त्यांना महाराजांचा इतिहास माहीत नसेल तर त्यांनी समजून घ्यावा. लोकसभेत ज्या प्रमाणे भाजपला या क्षेत्रातून हद्दपार केले, त्याप्रमाणे पक्षाच्या शिलेदारांनी अधिक मेहनत घेत या क्षेत्रात न इतिहास घडवावा, असे आव्हान केले.
जागृती पतसंस्था गैरव्यवहार प्रकरण हाताळण्यात हे सरकार अपयशी; प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील
या भागात जागृती पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणात, सहा हजार खातेदारांना फटका बसला. त्या बद्दल या सरकार ने काय केल. ज्यांचे पैसे गुंतले, वाया गेले,त्या करिता सरकारने काय व्यवस्था केली, सरकार कडे सहकार खात आहे त्यातून का नियोजन केले नाही. या प्रश्नाचा उत्तर या सरकारने द्यायला पाहिजे, जेंव्हा हे लोक आपल्याकडे मत मागायला येतील त्यांना प्रश्न विचारा की, तुम्ही या प्रकरणात काय केल, हे सरकार जागृती पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणातील पिडितांना न्याय देऊ शकले नाही, करिता यांना धडा शिकवा, असे प्रतिपादन प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
या प्रसंगी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, माजी खासदार खुशाल बोपचे, माजी खासदार मधुकर कुकडे, अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष जावेद हबिब, विध्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाने, माजी आमदार दीनानाथ पडोळे, माजी आमदार रमेश बंग, निरीक्षक बजरंगसिंह परिहार, युवा नेता रविकांत बोपचे, जिल्हा अध्यक्ष सौरभ रोकडे, कार्याध्यक्ष राघवेंद्रसिंह बैस, शामराव उइके, रूपेश मेंढे, इरफान पटेल, मंजुताई डोंगरवार, ओमप्रकाश रहांगडाले, हेमराज अंबुले, प्रकाश बघेले, चंदाताई शर्मा, रविंद्र वंजारी, भाग्यश्री केळवतकर, वैशाली तूरकर, दीपलता ठकरेले, धानसिंग बघेले, युवराज शहारे, खेमराज बघेले, रविकुमार कुर्वे, भोजराज उइके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्यंने उपस्थित होते.

