घरामध्ये लोखंडी तलवार बाळगणाऱ्या एकावर गुन्हा दाखल… आमगाव पोलिसांचा दणका !

0
507

आमगांव : याबाबत माहिती अशी की,पो.नि.तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन हद्दीतील तिगाव बीट इंचार्ज मपोहवा ममता दसरे यांना परीसरातून मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहीतीच्या आधारे मौजा तिगाव येथील अशोकनाथ करणनाथ सुतार रा.तिगाव हा त्यांचे राहते घरात अवैधरीत्या धारदार शस्त्र बाळगून आहे.

अशा गोपनिया सूत्राकडून मिळालेल्या माहीती नुसार पो.स्टे. डोटेक्शन ब्रांच चे पोउपनि शहारे, पोहवा दसरे, पोशि उपराडे, मन्यार, चोपकर ,उके/, शेन्डे चासफौ राऊत यांचे सह शासकीय वाहन क्र एम एच ३५ डी ५६८ नो पो.स्टे.स्टे.डा. सान्हा क्र ४६/२०२४ दिनांक ११/०९/२०२४ रोज़ी साय. ६ वा. अन्वये मौजा तिगाव येथे पोहचुन गावातील दोन प्रतिष्ठीत पंचाना बोलावून त्यांना वर नमूद इसमाचे घराची झडती घेतली असता त्याचे राहते घरातील माजघरात लाकडी दिवानच्या गादीच्या खाली एक लोखंडी तलवार ज्याची लांबी ३२ से.मी, रुदी-४ से.मी. पिवळया धातूची सिहांची नोकदार मुठ असलेली वरच्या बाजूने धार-धार व टोकदार वजन अंदाजे १.५० कि.ग्रॅम. ज्याची अंदाजे किमंत ६००/- रुपये ची लोखंडी तलवार मिळून आली. त्याचे विरुध्द कलम ४.२५ भा.ह. का. सह कलम मुबंई पोलीस अधिनीयम सन १९५१ कलम ३७ (१) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleदूसरी बार डीआरयूसीसी सदस्य बने रितेश अग्रवाल
Next articleसिरोंचा येथील जनसंपर्क कार्यालयचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेबांचा हस्ते उदघाटन..