आमदार कोरोटे यांच्या हस्ते मुख्याध्यापक नीलकंठ बिसेन यांचा सत्कार

0
282
1

आमगांव : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा चिरचाळबांध येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक  नीलकंठ बिसेंन यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन आमदार सहसराम कोरोटे यांनी आयोजित शिक्षक दिन समारोह चे अवचित साधून शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन विजयालक्ष्मी सभागृह आमगाव येथे सत्कार करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषद पूर्वअध्यक्ष उषाताई मेंढे, जि प सदस्य विमलताई कटरे जि प सदस्य छबुताई उके, जि प सदस्य छायाताई नागपुरे पंचायत समिती सालेकसा सभापती गणवीर मॅडम , उपसभापती बोहोरेजी, पंचायत समिती सदस्य रेखाताई फुंडे , आमगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष संजय भाऊ बहेकर , पूर्व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बन्सीधर अग्रवाल पंचायत समिती आमगावचे गटशिक्षणाधिकारी आर पी रामटेके, विस्तार अधिकारी राजू भाऊ येट्रे, जे डी मेश्राम उपस्थित होते.