सतत कोसळणाऱ्या पाऊसामुळे अहेरी तालुक्यातील रामपूर चेक वॉर्ड क्र. 1 येथील रहवासी असलेले बयाबाई बद्दीवार यांचे संपूर्ण घर खचून ते बेघर झाले. अश्या परिस्थितीची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौं. भाग्यश्रीताई आत्राम यांनी थेट रात्रंला रामपूर चेक गाठून घराची पाहणी केली व पीडिताशी संवाद साधून त्यांचे सांत्वन करत मदतीसोबतच मायेचा हात देत त्यांना जवड घेत चिंता करू नका मी आहे अश्याप्रकारचा खंबीर असा आधार दिला व घरकुल देखील मिळवून देण्याची ग्वाही दिली. यावेळी तालुका अध्यक्ष सिनूभाऊ विरगोंनवार, युवानेते स्वप्निलभाऊ श्रीरामवार, महेश बाकीवार, अशोकभाऊ वासेकर, रामा बद्दीवार, पोच्चा पनीमवार, किशोर बद्दीवार, मुत्ता बद्दीवार, नरेश ठाकरे, व मोठ्या संख्येने वॉर्डातील लोक देखील उवस्थित होते.

