राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शिव स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे त्यातच सदर यात्रा ही दिनांक १२ सप्टेंबर ला वासवी फंक्शन हॉल अहेरी येथे आयोजित केली.
आष्टी ते आलापल्ली (३५३)या राष्ट्रीय महामार्गावरून अहेरी कडे जाणारे माजी गृहमंत्री तथा विद्यमान आमदार अनिल देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार हे शिव स्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमानिमित्ताने अहेरी कडे येत होते यावेळी अहेरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या बोरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व अतुल गण्यारपवार समर्पित असलेले कार्यकर्त्यांनी बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाक्यावर गावतील महिला व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी यांनी पुष्प, गुच्छ, हार व वाजा गाजात गोंडी नृत्य सादर करीत गृहमंत्री अनिल देशमुख व जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांचे जंगी स्वागत केले मात्र अनिल देशमुख हे राष्ट्रीय महामार्गाची अवस्था बघून आश्चर्य वाटले.
अतुल गण्यारपवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेतल्यानंतर या भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची संघटन जोमाने वाढवण्याची काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरूवात केले आहे व अहेरी विधानसभा मध्ये सुद्धा गण्यारपवार यांनी तुतारी घरात घरात पोहचविण्याचे सुद्धा काम जलद गतीने करित आहे विशेष म्हणजे अहेरी, एटापल्ली मुलचेरा सिरोंचा भामरागड या तालुक्यातील अनेक मार्गांची दुरावस्था असुन सुद्धा बोरी येथील होणाऱ्या स्वागत कार्यक्रमासाठी पाचही तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते यावेळी महिला जिल्हाध्यक्षा संगीता राऊत, जिल्हा चिटणीस दिलीप भटपल्लीवार,सत्यनारायण गुप्ता,अहेरी तालुका अध्यक्ष रमेश चुक्कावार,एटापल्ली तालुका अध्यक्ष संतोष समुद्रालवार ,सिरोंचा तालुका अध्यक्ष सागर मुलकला, मुलचेरा तालुका अध्यक्ष अशोक आरके, भामरागड तालुका अध्यक्ष मंगेश मट्टामी, आदिवासी सेल प्रदेश अध्यक्ष वांडरे,करण गण्यारपवार प्रदेश युवक राष्ट्रवादी, गडचिरोली विधानसभा अध्यक्ष राजू आत्राम, अमोल गण्यारपवार नगरसेवक तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक सामाजिक कार्यकर्ते अनिल किरमीरवार, काशिनाथ मोहूर्ले, सुरेश आदे, राजन्ना संगर्तीवार,सतिश सोयाम, विस्तारी गंगाधरीवार, सचिन रामगोनवार, संतोष पुरुषोत्तमवार सिनु कम्पेलवार, सौरभ खांडरे, पुंडलिक आदे ,राजू आत्राम, अभय जोद्दार,अक्षय
सोयाम,मोहण दुर्गे, प्रविण दहागावकर,शंकर निलम,ओजस्वीनी गुरनुले, संगिता वालदे राजू पुप्पाला,संतनु गलबले, यांच्यासह आदि कार्यकर्ते उपस्थित होते

