आलापल्ली: तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि मुख्य शहर अशी ओळख असलेल्या अल्लापल्ली येथे टायगर ग्रुप द्वारा आयोजित गणेशोत्सवात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते अतिदुर्गम भागातील गरजूंना सायकल,शिलाई मशीन आणि तीन चाकी सायकल वाटप करण्यात आले.
आलापल्ली येथे टायगर ग्रुप तर्फे क्रीडा संकुल परिसरात मागील वर्षापासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे.मागील वर्षी त्यांनी केदारनाथचा देखावा सादर केला होता.यंदा देखील त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्याचा जिवंत देखावा सादर केला आहे.याठिकाणी भव्य असा मेला देखील सुरू असून गणेश भक्तांची रीघ लागली आहे. दरम्यान ९ ते १६ सप्टेंबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१३ सप्टेंबर रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते या ठिकाणी अहेरी तालुक्यातील दुर्गम अशा कमलापूर, छल्लेवाडा, कोडसेलगुडम व ताटीगुडम परिसरातील गरजूंना सायकल, शिलाई मशीन व तीन चाकी सायकल वाटप करण्यात आले.
दरम्यान मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची याठिकाणी आगमन होताच टायगर ग्रुपच्या सदस्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.प्रथमतः मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी येथील गणपतीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.त्यानंतर त्यांनी गरजूंना सायकाय,शिलाई मशीन व तीन चाकी सायकलचे वाटप केले.यावेळी माजी जि प उपाध्यक्ष रवींद्र बाबा आत्राम,सिनेट सदस्य तनुश्री आत्राम,माजी पंचायत समिती सदस्य हर्षावर्धन बाबा आत्राम,सरपंच शंकर मेश्राम,राकॉचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,पुष्पाताई अलोने,कैलास कोरेत,सोमेश्वर रामटेके,सुरेंद्र अलोने,पेद्दीवार,टायगर ग्रुपचे सदस्य तसेच आदी राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*मंत्री धर्मराव बाबा यांच्याहस्ते अन्नदान*
टायगर ग्रुप तर्फे क्रीडा संकुल परिसरात आयोजित गणेशोत्सवात गणपतीचे दर्शन घेऊन येथील जिवंत देखावा व मेला मध्ये आनंद लुटण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होताना दिसून येत आहे.खेड्यापाड्यातून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यातर्फे महाप्रसाद वितरण कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले.यावेळी मंत्री आत्राम यांनी उपस्थित राहून भाविकांना महाप्रसाद वितरण केले. तसेच आपल्या कार्यकर्त्यांना मदतीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.