मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा 2” अंतर्गत स्पर्धेत जि.प. शाळा सोनपुरी तालुक्यात प्रथम

0
152

सालेकसा: बाजीराव तरोने

राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनेंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा-टप्पा 2“ अभियानात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था विभागात तालुक्यातील  जिल्हा परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळा सोनपुरी शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत मानाचा तुरा धारण केला आहे.

या अभियानाच्या माध्यमातून शाळेने अधिक प्रभावी विस्तार करत पायाभूत सुविधा, शासन अंमलबजावणी, शैक्षणिक गुणवत्ता, करण्यासोबत अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञान वापर, पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यावसायिक शिक्षण तोंड ओळख, क्रीडा गुणाचा विकास, शासकीय योजनेचा लाभ इत्यादी निकष व उद्दिष्टांवर काम करत शाळेने प्रथम क्रमांक पटकावून त्याची परिणती म्हणून दि. १४ सप्टेंबर रोज शनिवार ला जिल्हास्तरीय मुल्यांकनासाठी जिल्ह्य़ातील शिक्षणाधिकारी मा. सुधिर महामुनी, डाएट प्राचार्य वैद्य ,मा.बिसेन सर क. शि. वि. अधिकारी सौ. विश्वकर्मा मॅडम  जि प गोंदिया, यांची चमू मूल्यांकनासाठी आले असून मान्यवरांनी शाळेच्या सर्व निकषांचे मूल्यमापन केले.
शाळा भेटीदरम्यान मान्यवरांनी समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यासाठी
शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक  एस. जी. नागपुरे, सर्व शिक्षक वृंद जयेश लिल्हारे, सुरेश चव्हाण, सुरज तुपट,  प्रदीप तावाडे, अमर म्हेत्रे, काटेखाये, कु. प्रभा गावंडे, सौ. हुकरे या अभियानात सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेऊन निकष पूर्णतेवर कार्य केला.
यावेळेस गावचे सरपंच अरुण मच्छिरके, उपसरपंच  उमेश चुटे, ग्रा .पं .सदस्या सौ . सरिताताई बावनकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  प्रेमकुमार लिल्हारे, सदस्य  जागेश्वर मच्छिरके,मधुकर खोब्रागडे,  मरस्कोल्हे सौ ओमबत्ती मछिरके,सौ. रामबती कुराहे उपस्थित होते.