वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-गजानन पोटदुखे
दिनांक :-16 सप्टेंबर 2024
दिनांक १५ सप्टेंबर २०२४ ला शिक्षणमहर्षी प्रा. पंकज चोरे मेमो. सर्व्हिस बाय स्टुडंट्स ट्रस्ट व सृजन स्कुल & ज्यू. कॉलेज ऑफ सायन्स देवळी च्या वतीने ‘ सर सारथी ’ गुरुवर्य शिक्षणमहर्षी प्रा. पंकज चोरे स्मृती ग्रंथाचा प्रकाशन सोहळा तुळजाई सभागृह देवळी येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून माजी खा. रामदासजी तडस, राजेशजी बकाने, मोहनबाबू अग्रवाल, बंडूजी जोशी, किरण ठाकरे, नरेंद्र मदनकर, राजेशजी रेवतकर ( गटशिक्षणाधिकारी ), दिनेशजी चन्नावार, अजयजी देशमुख, काळपांडे सर, मालदुरे सर, चौधरी सर, हरिदासजी ढोक, अशोक राऊत तसेच देवळी मधील सर्व शाळेतील मुख्याध्यापक व संचालक यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात स्व. प्रा. पंकज चोरे यांच्या प्रतिमेला व्दिप प्रज्वलाने झाली. उपस्थित मान्यवरांनी सरांनी केलेल्या कार्याची आठवणी व स्मृतींना उजाळा दिला. त्याचबरोबर नगर परिषद कॉलेज मध्ये त्यांच्या काळात शिकलेले व सरकारी अधिकारी झालेले सर्व विध्यार्थी यांनी सरांच्या मार्गदर्शन व गरजूवंत विध्यार्थ्यांना केलेली मदत या विषयी सांगितले.’सर सारथी’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांची मुले अथर्व चोरे, उत्कर्षा चोरे, वेदांत चोरे, मृणाली चोरे व सरांचे विध्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले.एखाद्या शिक्षकाला विद्यार्थ्यांकडून मिळणारा हा सन्मान अद्वितीय होता. सन्मान प्राप्त होतांना सरांच्या एखाद्या विध्यार्थ्यांच्या जीवनात असलेल्या त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून देणारा हा क्षण होता. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. श्रद्धा पंकज चोरे यांनी आपल्या मनोगतात सरांचे राहिलेले अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्याची ग्वाही दिली.कार्क्रमाचे प्रास्ताविक भाषण नम्रता फलके IIS अधिकारी यांनी केले. संचालन वैष्णवी भुसारी यांनी केले. तर आभार भूषण कडू यांनी केले. संस्थेचे सचिव डॉ. प्रशांत चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या आयोजनांबद्दल धन्यवाद दिले. कार्यक्रमाला नगर परिषद कॉलेज मधील प्राध्यापक, शिक्षक व विध्यार्थी, शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, शिक्षक, विध्यार्थी, सरांचे बालमित्र, मित्रमंडळी, त्यांचा संपूर्ण परिवार, तसेच सृजन मधील मुख्याध्यापिका, प्राचार्या, सर्व शिक्षक, विध्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.