देवळीची समिक्षा हटवार यांना राष्ट्रीय कलाभुषण पुरस्कारानी सन्मानित……..

0
244

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे

दिनांक :-16 सप्टेंबर 2024

देवळी येथील उत्कृष्ट गायिका समिक्षा संजय हटवार यांना कोल्हापूर येथे अभिनेते सुरेशभाउ डोळस यांच्या हस्ते राष्ट्रीय कलाभुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तेजस फाउंडेशन नाशिक तर्फे 8/9/2024 रोजी राजश्री शाहू महाराज स्मारक सभागृह,कोल्हापूर येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन कलाकारांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला उपस्थित मा.सागर शेळके (संपादक,एस. एल. एस.न्युज चॅनेल,कोल्हापूर), मा. किशोर राऊत (संचालक,तिरंगा अकॅडमी,छ.संभाजीनगर),मा.एम.नटराज (सिने अभिनेते,नाट्यकलावंत,ठाणे),मा.प्रकाश टोमणे (समाजसेवक),मा.दत्तात्रेय चव्हाण (पोलीस निरीक्षक कोल्हापूर),मा.अशोक मोहिते (कवी,साहित्यिक, मा.सैनिक),मा.सुरेशभाउ डोळस (जेष्ठ अभिनेते) व तेजस फाउंडेशन च्या अध्यक्षा अभिनेत्री मेघाताई डोळस ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचा शेवट महाराष्ट्र स्फूर्ती गीताने झाला.समिक्षा ला एकाच वर्षात तीन पुरस्कार मिळाल्याबद्दल तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.आणि तिच्या यशाचं श्रेय तीने तीच्या आई वडिलांना, गुरुवर्य सौ.केतकीताई कुळकर्णी आणि तीच्या शुभचिंतकांना दिले.