नागपुर : मित्रांनो, मानवी जीवन जगत असताना आपल्या गावांच्या, आपल्या परिसराच्या व समस्त मानव समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निःस्वार्थपणे व निर्भयपणे समाजकल्याण जनकल्याण व राष्ट्र कल्यानार्थ कार्य करणाऱ्या सर्वच महापुरुषांच्या पावलांवर पाऊल ठेवत सर्वांचीच निस्वार्थपणे व निर्भयपणे समाजकल्याण जनकल्याण व राष्ट्र कल्यानार्थ कार्य करण्याची एकता असेल तर मोठमोठ्या समस्यांना योग्य मार्गी लावल्या जाऊ शकतात…!
मित्रांनो, आपल्या गावांसह परिसरातही सर्वांगीण प्रगतीचे कामे होत असतील तर त्याचा शुद्ध अंतःकरणातून समर्थन करावा आणि आपल्या गावांसह परिसरातही विनासाचे कामे होत असतील तर त्याचा शुद्ध अंतःकरणातून विरोध करावा, असी मोलाची कामगिरी नागपूर नाका नंबर पांच भंडारा रोड पारडी परिसरातील नगरपंचायत बिडगांव नागेश्वर नगर ए येथील सर्व महिलांनी व पुरुषांनी तसेच सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी नागेश्वर नगर ए याठिकाणी उघडणारी बियर बार रद्द झालीच पाहिजे यासाठी दि १५-०९-२०२४ रोज रविवारला मोलाची एकता दाखवून एक मोठी समस्या योग्य मार्गी लावण्यासाठी ठोस पाऊल उचलले.
भंडारा रोड नागपूर नाका नंबर पांच पासून तर बिडगांव नगरपंचायत, सत्यमनगर कापशी खुर्द, तरोडी, तरोडी खुर्द सह अनेकानेक गावांना जोडणारा हा एकुलता एक हाच मोठा रस्ता असल्यामुळे या रस्त्यांवरुन अनेकानेक कामगारांसह अनेक महिलांनाही आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाह करण्याकरिता मोलमजुरी करण्यासाठी याच रस्त्याने कामांवर जावें लागते, आणि याच रस्त्याने शाळेत जाणाऱ्या असंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनींचेही आवागमन फार मोठ्या प्रमाणात आहे, आणि मित्रांनो याच रस्त्यावर बसलेल्या नागेश्वर नगर ए येथे बियर बार उघडल्याने या रस्त्यावर ये जा करणाऱ्या लोकांना व गावात राहणाऱ्या ग्रामस्थांना कितीतरी समस्यांचा सामना करावा लागेल याचा थोडातरी विचार न करता शासनाने बियर बार साठी परवानगी दिली आहे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.
नागेश्वर नगर ए हा परिसर पारडी पुलिस ठाणे अंतर्गत येत असल्याने पुलिसवृंद पुलिस व्हेरिफिकेशन करत असतांना नागेश्वर नगर ए येथील ग्रामस्थांना कळले की आपल्या गावात आता बियर बार उघडत आहे आणि बियर बार उघडल्याने गावांसह परिसरातील लोकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल म्हणून या भागात बियर बार नकोच , “गाव करे सो राव नही” हीच संकल्पना ज्ञानीमनी ठेवून माणूसकी धर्म पाळत सर्व ग्रामस्थांसह सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दि १५-०९-२०२४ रोज रविवारला आमच्या गावात बियर बार नकोच असा विरोध करत बियर बार ची परवानगी रद्द करण्यात यावी यासाठी पोलिस ठाणे पारडी नागपूर येथे आवेदन देण्यात आले.