शाहिस्ता ‘च्या पुढाकाराने  अपनापन वृद्धाश्रमात श्रीगणेश चतुर्थी उत्साहात साजरी 

0
124
1

भद्रावती : सध्या देशभरात हिंदू मुस्लिम वाद विकोपाला जात असल्याचे भयावह दृष्य बघायला मिळत असतांना शहरातील अपनापन वृद्धाश्रमाच्या संचालिका शाहिस्ता खान पठाण यांनी सर्वधर्म समभावाच्या दृष्टीने आश्रमातील हिंदू बंधू भगिनीच्या धार्मिक भावना व हीत लक्षात घेऊन त्यांनी आश्रमात श्रीगणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.आश्रमात गणेश पेंडाल टाकून गणेश प्रतिमेची विधिवत स्थापना करून दररोज नित्य नियमाने गणेश आरती व पूजा पार पाडण्यात आली सदर आरतीच्या वेळेस शाहिस्ता पठाण या आवर्जून उपस्थित राहायचे पठाण यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन ही करण्यात आले व आश्रमाच्या वतीने श्रीगणेशाचे विसर्जन ही करण्यात आले. समाज कारणात सदैव पुढाकार घेणाऱ्या व नेहमी नकाब परिधान करणाऱ्या शाहिस्ताने स्वतः पुढाकार घेऊन गणेश मूर्तीची स्थापना करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.