सिरोंचा येथील आरोग्य शिबिरात ९२७ रुग्णांची तपासणी,मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा अभिनव उपक्रम.

0
60

सिरोंचा: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात व माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम तसेच डॉ.मिताली आत्राम यांच्या पुढाकारातून पहिल्यांदाच सिरोंचा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.१५ सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय परिसरात संपन्न झालेल्या शिबिरात जवळपास ९२७ रुग्णांची आरोग्य तपासणीचा करण्यात आले.

 

अहेरी विधानसभा क्षेत्र हा अतिदुर्गम भाग असल्याने येथील विविध आजारांच्या रुग्णांना शहरात जाऊन उपचार घेणे शक्य नसल्याने मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात ‘मावा स्वास्थ्य मावा अधिकार’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत खेड्यापाड्यातील रुग्णांची शोध घेऊन योग्य उपचार व औषधोपचार केले जात आहे. सिरोंचा तालुक्यातील दुर्गम भागातील रुग्णांना देखील योग्य उपचार व सल्ला मिळावा या उदात्त हेतूने माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम तसेच त्यांची अर्धांगिनी डॉ.मिताली आत्राम यांनी १५ सप्टेंबर रोजी सोरोंचा तालुका मुख्यालयात मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.

 

विशेष म्हणजे या शिबिरात डॉ. ध्रुबोज्योती साहा, डॉ.स्नेहा अग्रवाल यासह इतर तज्ञ डॉक्टरांनी व त्यांच्या चमूने आरोग्य तपासणी व मोफत उपचार केले. यातील जवळपास ३२७ रुग्णांना नेत्र विकार असल्याचे आढळले त्यांच्यावर शस्त्रक्रिया आवश्यक असल्याने रुग्णांना पुढील तारीख देऊन प्राचारण करण्यात आले.त्यांना नागपूर येथे पाठवून लेजर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

 

विशेष म्हणजे यापूर्वी देखील विविध ठिकाणी आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील बरेच रुग्णांवर उपचार देखील झाला. अनेक वयोवृद्धांना देखील दृष्टी मिळाले आहे.

Previous articleबियर बार रद्द करण्याच्या मागणीला घेऊन पारडी पोलिसांना निवेदन…
Next articleधक्कादायक : ….’ तो ‘ पूल अतिपावसाने कोसळला..!