के के इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या साक्षी बावनथडे ची विभागस्तरीय स्पर्धेकरिता निवड

0
248
1

आमगांव : दि. 14 सप्टेंबर 2024 ला जिल्हा क्रिडा संकुल येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध शाळेतून 200 पेक्षा ही जास्त खेळाडूनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेत के के इंग्लिश प्रायमरी स्कूलची खेळाडू साक्षी बावनठडे ने इतर खेळाडूंशी झुंज देत उत्कृष्ट प्रदर्शन केले.
नागपूर इथे होणार्‍या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले.
खेळाडूनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे कार्यकारी डॉ संघी सर, मुख्याध्यापिका रिना भुते मॅडम, व आई वडिलांना दिले. शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी खेळाडूना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.