आमगाव: आमगाव, देवरी ,सालेकसा आणि उपरोक्त तालुक्यांच्या सिमे लगतच मध्यप्रदेश राज्याच्या लांजी तालुक्यातील बहुसंख्य युवक उच्च शिक्षण घेण्यासाठी किवा नोकरी निमित्त पुण्यात असतात. प्रवाशाना ह्या ट्रेन साठी 25 ते 50 किमी अंतर वहन करावे लागते. त्यांच्यासाठी प्रवास सोईस्कर व्हावे करीता ‘आजाद हिन्द एक्सप्रेस’ चा थांबा आमगाव रेल्वे स्थानकावर द्यावा. प्रवाशाना होणाऱ्या त्रासापासून मुक्ति मिळावी म्हणून ‘ग्राहक पंचायत आमगाव’ तर्फे गढ़चिरोली/चिमूर क्षेत्राचे खासदार डॉ नामदेवराव किरसान यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
‘ग्राहक पंचायत ‘चे पदाधिकारी प्राचार्य वसंत मेश्राम ,डॉ अनील मुंजे,वरिष्ठ पत्रकार जगदीश शर्मा यांनी खासदार किरसान यांची आमगाव येथील निवास स्थानी भेट घेऊन निवेदन दिले.

