खा. प्रफुल्ल पटेल यांना शालेय पोषण आहार कर्मचारी डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी दिले निवेदन…

0
322

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची निवेदनात केली मागणी…

गोंदिया : गेल्या 14 वर्षांपासून शालेय पोषण आहार योजनेत डाटा एन्ट्री ऑपरेटर हे कंत्राटी पद्धतीवर काम करत असून डाटा ऑपरेटर यांना सेवेत कायमस्वरूपी करण्याच्या मागणीला घेऊन शालेय पोषण आहार योजना डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटना गोंदिया जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.

वाढत्या महागाईमुळे कमी पगारामध्ये नोकरी करत असताना अनेक अडचणी येत असतात. तसेच गेल्या 14 वर्षांपासून सेवा देत असल्यामुळे शासनाने कायमस्वरूपी करावे अशा मागणीचे निवेदन यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांना देण्यात आले.

निवेदन देतेवेळी शालेय पोषण आहार डेटा एन्ट्री ऑपरेटर संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र रहांगडाले, स्मिता करंजेकर, शितल फुल्लूके, निशरत शेख, शुभम उईके, सम्यक मोटघरे, यश गालपल्लीवार, प्राजक्ता बोहरे. आदी उपस्थित होते.