गोंदिया : स्थानिक के टी एस जिल्हा सामान्य रुग्णालयात डायलेसिस केंद्रात दि.17 सप्टेंबर रोजी
जागतिक रुग्ण सुरक्षा दिन जन जागृती अभियान
आयोजित करण्यात आले होते.
जागतिक आरोग्य संघटना(WHO) च्या मार्गदर्शनानुसार दर वर्षी 17 सप्टेंबर रोजी सर्व आरोग्य संस्था मध्ये
रुग्ण सुरक्षा दिन साजरा करण्यात येतो या अभियानाचे उद्घाटन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी केले व मार्गदर्शक म्हणून डॉ मयंक जैस्वार प्रभारी नर्सिंग स्टाफ दीपाली वानखेडे नर्गिस अली नूतन काठाने प्रयोग शाळा तंत्रज्ञा
श्रीमती रंगारी , नीता टोंगे हर्षल अंबुले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या वेळी स्टाफ तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांना मार्गदर्शन करताना डॉ सुवर्णा हुबेकर यांनी आवाहन केले नॅशनल क्वालिटी आशुरन्स प्रोग्रॅम (NQAS) अंतर्गत आपन रुग्णाला आरोग्य सेवा ही अतिशय गुणवत्ता पूर्ण देण्याची हमी घेतलेली आहे .
यावर्षीची जागतिक रुग्ण सुरक्षा दिनाची थीम ” रुग्ण सुरक्षिततेसाठी निदान सुधारणे” आहे, “हे बरोबर मिळवा, सुरक्षित करा! ” ही थीम रुग्णाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी योग्य आणि वेळेवर निदानाचे महत्त्वपूर्ण महत्त्व अधोरेखित करते.
डॉ हुबेकर यांनी सांगितले की आता संशोधनात असे दिसून आले आहे की रुग्ण स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि वैद्यकीय त्रुटी आणि प्रतिकूल घटना टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. त्यांच्या योगदानाने योग्य निदान स्थापित करण्यात, उपचाराचा सर्वोत्तम मार्ग ठरवण्यात, सर्वात योग्य प्रदाते निवडण्यात, निर्धारित काळजी प्रशासित केली जाईल याची खात्री करण्यात येत आहे.
या वेळी उपस्थित स्टाफ यांना डॉ मयंक जैतवार यांनी जागतिक रुग्ण सुरक्षा बाबत शपथ दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डायालेसिस विभागाच्या स्टाफ ने सहकार्य केले.