भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0
97

नागपुर: भारताची पुर्व राजधानी व माहाराष्ट्राची पावन भूमी नागपूर माहानगरीत दिनांक १७-०९-२०२४- रोज मंगळवारला भगवान विश्वकर्मा जयंती निमित्ताने राष्ट्रीय कांटेक्टर लेबर युनियन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाईक रैली चे भव्यदिव्य आयोजन करुन भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली,,,,!!

भव्यदिव्य बाईक रैली चे प्रस्थानाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नागपूर उपजिल्हाप्रमुख व पोवार समाज एकता मंच पुर्व नागपूर चे वरिष्ठ संरक्षक श्री यशवंत गुड्डू भाऊ राहांगडाले हे असून बाईक रैली ला हिरवी झाडी दाखवून यशस्वी होण्याचे आवाहन करणारे राष्ट्रीय ओबीसी माहासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या शुभहस्ते बाईक रैली ला प्रस्थान करण्यात आले,,,,,!!

भव्यदिव्य बाईक रैली चे प्रस्थान राष्ट्रीय कांटेक्टर लेबर युनियन च्या मुख्य आफिस सत्तब्दी चौक मानेवाडा रिंग रोड नागपूर पासून झाले असून पुर्ण नागपूर परिसराच्या चौकाचौकात डिजेच्या तालावर देशभक्ती गीत व भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त गाणे वाजवत मोठ्या उत्साहात फिरत फिरत उत्तर नागपूर पावरग्रिड चौकापर्यंत आली,,,!!

राष्ट्रीय कांटेक्टर लेबर युनियन तर्फे भगवान विश्वकर्मा जयंती निमित्ताने स्थायी कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कांटेक्टर लेबर युनियन चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री विजयजी पटले हे असून कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे माजी ऊर्जामंत्री डॉ नितिन राऊत हे होते,,,,!!

कार्यक्रमाच्या विचारमंचावर अखिल भारतीय क्षत्रिय पोवार पंवार माहासंघ भारत चे राष्ट्रीय संगठन सचिव व पोवार समाज एकता मंच पुर्व नागपूर चे वरिष्ठ संरक्षक सन्माननीय श्री हिरदीलाल नेतरामजी ठाकरे, व उत्तर नागपूर चे माजी आमदार डॉ मिलींद माने हे असून मुख्य उपस्थिती राष्ट्रीय कांटेक्टर लेबर युनियन चे राष्ट्रीय सचिव श्री चेतनजी तुरकर, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सन्माननीय अजयजी हरिणखेडे, पुर्व नागपूर अध्यक्ष श्री सचिनजी बिसेन, गणेशजी बिसेन, श्री सुनीलजी पटले, श्री दिनेशजी ठाकरे उत्तर नागपूर, बाहादुरा संघटना अध्यक्ष अशोकजी ठाकरे श्री परिहारजी यांच्यासह राष्ट्रीय कांटेक्टर लेबर युनियन संगठनेच्या सर्वंच कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता,,,,!!

कार्यक्रमांचे सुंदर सूत्रसंचालन श्री फेदूलालजी ठाकरे व श्री दिलीप राहांगडाले माजी अध्यक्ष पोवार समाज संघटना रामटेके नगर यांनी केले असून श्री टेकचंदजी राहांगडाले यांनी आभार व्यक्त केले, कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांसह सर्व कार्यकर्ते व सदस्य सर्वांचेच आभार व्यक्त केले,,,,!!

राष्ट्रीय कांटेक्टर लेबर युनियन संगठनेच्या सर्वंच कार्यकारिणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भगवान विश्वकर्मा जयंती निमित्ताने भव्यदिव्य भोजनाची व्यवस्था केली होती, कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांसह सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला आणि राष्ट्रीय कांटेक्टर लेबर युनियन संगठनेच्या पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या,,,,,!!!