अहेरी /प्रतिनिधी
मानव विकास मिशन अंतर्गत पाच किलोमीटर अंतरावरून शाळेत ये जा करणाऱ्या मुलींना सायकल वाटप करण्यात येते. त्यानुसार अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील भगवंतराव हायस्कूल मध्ये सहा विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. सायकलचे वाटप करताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कवीश्वर चंदनखेडे,माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आशिफ पठाण तसेच शाळेचे मुख्याध्यापक आर. एन.मेश्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी शालेय विद्यार्थी व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

